टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 तुमचे स्वतःचे वेबपेज आणि माहिती इंटरनेटच्या जाळ्यामध्ये

आपण आतापर्यंत बर्‍याच करोडो नाही पण निदान शेकडो वेबसाइट पाहिल्या असतील. पण कधीही आपल्या मनामध्ये असा विचार येत नाही की किती मज्जा येईल जर आपली पण वेबसाइट असती! कुणालाही आपली माहिती सांगताना "माझी वेबसाइट बघ!" असे सांगितले असते. आणि त्याहूनही जास्त मज्जा आली असती जर आपल्याला आपली माहिती आपल्या वेबसाइटवर मराठीमध्ये असती.
सध्या 'ब्लॉग' हा वेबसाइटला पर्याय असला तरी त्याच्या एका साचेबंद स्वरूपामुळे समाधान होत नाही. कारण नाही म्हटले तरी बर्‍याच गोष्टी ब्लॉगवर करता येत नाहीत.
CMS  (Containent Management System)  म्हणजेच एका तयार प्रोग्रॅमद्वारे अद्ययावत वेबसाइट बनविता येते. परंतू हे देखिल तितकेसे सोपे नाही, कारण त्यासाठी आपणास वेबसाइट विकत घेऊन त्यावर तो प्रोग्रॅम अपलोड करून तो व्यवस्थित सेट करून संपूर्ण समजून घ्यावा लागतो जे अजूनही जास्त कुणाला येत नाही.
थोडक्यात ब्लॉगमुळे समाधान नाही कारण त्यावर आपणास हव्या असलेल्या सर्वच गोष्टी शक्य नाहीत तसेच त्याचे स्वरूपदेखील इतरांसारखेच असते, निराळे नसते. तर दुसरा प्रोग्रॅम शक्य नाही म्हणून आपणास हवे तसे स्वतःचे वेबपेज आणि एखाद्या वेबसाइटप्रमाणे स्वरूप असलेल्या त्या आपल्या संकेतस्थळावर आवश्यक बर्‍याच गोष्टी (ज्या साधारणपणे एखादी वेबसाइट बनविताना देखिल शक्य होत नाहीत.)  उपलब्ध असतील याची अपेक्षा अनेकांना असते.
सध्यातरी आपल्या मनाप्रमाणे आपल्याला हवे तसे संकेतस्थळ प्रत्येकाला (ज्याला वेबसाइट बनविता येत नाही त्यालाही) शक्य नसले तरी आपल्याला हव्या असलेल्या जवळ-जवळ सर्वच गोष्टी सहज सोप्या पद्धतीने वापरून आपले संकेतस्थळ बनविण्यासाठी मदत करणार्‍या काही मोजक्याच वेबसाइट सध्या उपलब्ध आहेत.
थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास.... एक अशी वेबसाइट अथवा आपले स्वतःचे वेबपेज ज्यावर आपण कुठली माहिती ठेवू शकता, आपणास हवे असलेले फोटोग्राफ्स ठेवू शकता, आपणास हवी असलेली गाणी अपलोड करून इतरांना ऐकण्यासाठी ठेवू शकता, आपणास हवे असलेले विडिओ ठेवू शकता, आपला ब्लॉग देखिल त्याला जोडू शकता, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप बनवू शकता, आपल्या आवडत्या वेबसाइटची यादी बनवू शकतो, मित्र-मैत्रिणींना निरोप ठेवू शकतो, इतरांना प्रतिक्रिया देण्यासाठी फॉर्म ठेवू शकता, मराठी अथवा आपणास हव्या असलेल्या भाषेमध्ये देखिल माहिती ठेवू शकता. (मराठी युनिकोड कसे टाईप करण्याबद्दलच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.)
यासर्व गोष्टी फारच सोप्या ऑनलाईन प्रोग्रॅमद्वारे वापरून काही मिनिटांमध्येच आपण आपले संकेतस्थळ बनवू शकता. महत्त्वाचे म्हणजे तेही "मोफत".
www.webs.com  आणि www.multiply.com  या अशाच दोन चांगल्या वेबसाइट आहेत.  या वेबसाइटवर आपले वेबपेज बनवू शकतो. आपणास कुठलीही तांत्रिक गोष्टींची माहिती नसली तरी या वेबसाइटवरील आपल्या मोफत अकाउंटद्वारे आपल्या खात्यातील सोप्या हाताळता येणार्‍या प्रणालीद्वारे आपण वर सांगितलेल्या सर्व गोष्टी वापरून आपले एक छानसे संकेतस्थळ बनवू शकतो.
साहजिकच मोफत आहे म्हणून आपल्या संकेतस्थळाच्या नावामागे या संकेतस्थळाचे नाव असेल. जसे जर आपण या वेबसाइटवर ' sachinpilankar '  या नावाने खाते उघडले असेल तर आपल्या संकेतस्थळाचे नाव  ' www.sachinpilankar.webs.com '  अथवा  ' www.sachinpilankar.multiply.com '  असे असेल.
काहिही असो पण स्वतःचे एक छानसे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाइट बनवायला कुणाला आवडणार नाही.
 www.webs.com  वर वेबसाइट बनविण्याची माहिती
 www.multiply.com  या वेबसाइटवर आपले मोफत खाते कसे उघडावे?
 www.multiply.com  या वेबसाइटवरील आपले खाते कसे हाताळावे?

No comments:

Post a Comment