१. | इंटरनेट एक्स्लोरर ब्राऊझरमध्ये www.webs.com वेबसाइट उघडा. |
| |
|
|
| |
२. | आता आपल्यासमोर खाली www.webs.com वेबसाइटचे पान उघडेल. |
| |
३. | नविन खाते उघडण्यासाठी खाली अशी लिंक असेल. |
| |
४. | इथे "Pick a Site Address:" च्या खालील जागेमध्ये आपणास आपल्याला हव्या असलेल्या वेबसाइटचे नाव टाईप करा. तर खालील जागेमध्ये आपणास हवा असलेला पासवर्ड द्यावा व त्याच खालील 'Create a Website' वर क्लिक करा.
टीप: आपण दिलेल्या नावाप्रमाणे आपल्या वेबसाइटचा पत्ता असेल. जसे www.sachinpilankar.webs.com इथे sachinpilankar च्या जागी आपल्या साइटचे नाव असेल. |
| |
५. | आता येणार्या जागेत आपली माहिती द्या. |
|
|
| |
६. | तर त्याच पानावर खालील जागेमध्ये आपल्या वेबसाइटसाठी निरनिराळे डिझाईन म्हणजेच टेम्प्लेट असतील त्यातील आपणास हव्या असलेल्या टेम्प्लेटवर क्लिक करा. |
|
|
| |
७. | तर त्याखालील जागेतील 'I agree to the Terms of Serivces' वर क्लिक करुन "Create my Site" बटणावर क्लिक करा. |
|
|
| |
८. | आता आपल्यासमोर त्यांच्या इतर सुविधा आणि ऑफरचे पान उघडेल त्यातील बाजूच्या बटणावर क्लिक करा. |
| |
९. | आता पुन्हा आपल्यासमोर येणार्या छोट्या चौकोनातील "Start building on my own" वर क्लिक करुन तेथिल "Continue" बटणावर क्लिक करा. म्हणजेच आपली वेबसाइट आपण स्वतः बनवूया. |
|
|
| |
१०. | आता आपल्या समोर आपल्या वेबसाइटचे पहिले पान असेल. सुरुवात करण्यासाठी प्रथम डाव्या बाजूच्या "content box" बटणावर क्लिक करा. |
|
|
| |
११. | आता आपण आपल्या पहिल्या पानावर हवे ते टाईप करा. आपण डाव्या बाजूच्या बटणांचा वापर करुन आपल्या पानावर फोटो अथवा विडिओ देखिल अपलोड करु शकता. आपणास हवे ते पानावर आणल्यानंतर त्यावरील छोट्याश्या चौकोनातील बटणावर क्लिक करा. |
|
|
| |
१२. | आपल्याला हवे ते पानावर घेतल्यानंतर शेवटी त्या पानाच्यावरील उजव्याबाजूला असलेल्या या बटणावर क्लिक करा. |
| |
१३. | बस्स इतकेच करायचे आहे आणि आपली वेबसाइट तयार. |
| |
| आता तुम्ही सुरुवातीला दिलेल्या नावाप्रमाणे आपली वेबसाइट तयार झाली असेल. जसे वर 'sachinpilankar' हे नाव दिले त्याप्रमाण मग त्याची 'www.sachinpilankar.webs.com' अशी वेबसाइट तयार होईल. म्हणजेच आपण दिलेल्या नावापूढे 'webs.com' असे देवून वेबसाइट पहा. |
| |
| |
१४. | आपल्या वेबसाइटवर इतर काही वेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी त्याच पानावरील 'Page Options' बटणावर क्लिक करा. तर 'New Page' बटणावर क्लिक करुन आपण आपल्या वेबसाइटवर नविन पान वाढवू शकता. |
|
|
| |
१५. | तर त्याच पानावरील या विभागाद्वारे आपण कधीही आपल्या वेबसाइटचे डिझाईन बदलू शकता. |
No comments:
Post a Comment