१. | इंटरनेट एक्स्लोरर ब्राऊझरमध्ये www.multiply.com उघडा. |
| |
२. | हि वेबसाइट उघडताच त्या पानाच्या वरील बाजूस आपणास आपल्या खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी लॉगीनची सोय दिसेल. त्यामध्ये आपला युजर आयडी आणि पासवर्ड देवून प्रवेश करावा. |
|  |
| |
३. | आता आपल्या खात्यामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम येणार्या पानाच्या वरील बाजूस असलेल्या या बटणावर क्लिक करा. |
| |
४. | आता आपण आपल्या संकेतस्थळाच्या पहिल्या पानावर असाल. या पानावर आपण आपणास हव्या असलेल्या सर्व गोष्टी (फोटोग्राफ्स, गाणी, विडिओ, ब्लॉग, ग्रुप, आवडत्या वेबसाइटची यादी, मित्र-मैत्रिणींना निरोप) ठेवू शकतो. या विभागामध्ये बदल करण्याची परवानगी फक्त आपणास असेल, इतरांना आपल्या वेबपेजच्या पत्त्यावर हेच पान दिसेल, परंतू ते फक्त पाहू शकता बदल काहिच करु शकत नाहित. |
| |
५. | इथे प्रत्येक विभागाखाली अथवा बाजूला त्या विभागामध्ये बदल अथवा माहिती भरण्याची सोय केलेली आहे. जसे पानाच्या सुरुवातीलाच 'About Me' या विभागाखाली '> Edit Welcome Message' अशी सोय असेल. या लिंकवर क्लिक करताच तुम्ही तुमच्या बद्दलची माहिती त्या जागेमध्ये भरु शकता. माहिती भरल्यानंतर खालील 'Save' या बटणावर क्लिक करावे. |
| |
६. | वर सांगितल्याप्रमाणेच त्याखालील जागेमध्ये आपण आपल्याला हवे असलेले फोटोग्राफ्स, ब्लॉग, विडिओ, गाणी आपल्या या पानावर भरु शकता, त्यासाठी त्या-त्या विभागाखाली तशी लिंक असेल. |
| |
७. | आपल्या खात्यामधिल सर्व गोष्टी एकाच ठिकाणी हाताळण्यासाठी चालू पानाच्या वरील बाजूस आपण असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा. |
| |
८. | आता आपल्यासमोर 'Add to My Site' असे पान उघडेल. |
|  |
| |
| इथे आपण सर्व गोष्टी एकाच ठिकाणी हाताळू शकता, जसे आपला एखादा ब्लॉग आपल्या या www.multiply.com वेबसाइटच्या खात्याला म्हणजेच आपल्या वेबपेजला जोडायचा असल्यास, आपल्या खात्यामध्ये फोटोग्राफ्स अपलोड करायचे असल्यास, तसेच विडिओ, गाणी, घटना, लेख अथवा समिक्षा, आवडत्या वेबसाइटची यादी, मित्र-मैत्रिणींना निरोप या सर्व गोष्टी या ठिकाणी देता येतात. |
No comments:
Post a Comment