टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

 मित्रांना शोधा ऑर्कुटवर (ORKUT)

शाळा-कॉलेज संपले की नोकरी आणि कामधंद्याचा खटाटोप सुरू होतो. या धावपळीत काही वर्षे सहज निघून जातात. मग कुठेतरी गर्दीमध्ये आपला एखादा जुना मित्र अथवा मैत्रीण आपणास भेटते आणि मग गप्पांची मैफल जमते. पण तीही तात्पुरताच. मग त्या मित्राचा अथवा मैत्रिणीचा फोन अथवा -मेलच्या माध्यमातून संपर्क सुरू होतो.  खूप वर्षांनी भेटलेल्या आपल्या मित्राबरोबर बोलण्यात आपला प्रमुख विषय असतो तो त्या जुन्या काळचा आपला ग्रुप आपले इतर साथीदार. क्वचितच काहींना आपले सर्व मित्र-मैत्रिणी सापडतात पण शक्यतो आपले जवळ-जवळ सर्वच साथीदार भविष्यामध्ये हरवून जातात.
ऑर्कुट ( ORKUT )  हे असेच एक जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधण्यात मदत करणारे सध्याचे इंटरनेटवरील एक प्रभावी मध्यम. ऑर्कुट ही देखिल गूगल याच कंपनीने उपलब्ध केलेली इंटरनेटवरील एक मोफत सेवा.
ज्याप्रमाणे एका मोठ्या राजवाड्यात असलेल्या शेकडो खोल्यांना जर दरवाजेच नसतील तर कुणीही एका खोलीतून दुसर्‍या खोलीत मग तीसर्‍या खोलीत असे सहज फिरू शकतो, त्याचप्रमाणे ऑर्कुट वरील आपल्या खात्यामध्ये फिरत-फिरत अथवा शोध घेत कुणीही येऊ शकते. ऑर्कुटद्वारे मित्रांना तसेच मित्रांच्या मित्रांना शोधणे, त्यांच्या खात्यामध्ये जाऊन त्यांच्यासाठी निरोप ठेवणे, आपल्या आवडीच्या विषयात रस असलेल्या नवीन मित्रांना शोधणे, तसेच विडीओ आणि फोटो यांची देवाण-घेवाण इ. बर्‍याच गोष्टी ऑर्कुटवर होत असल्याने तसेच वापरायला फारच सोपे असल्याने लगेचच ऑर्कुटची सवय होते.
 ऑर्कुटमध्ये सभासद कसे व्हावे?
 ऑर्कुटवरील आपल्या खात्यातील आवश्यक गोष्टी
 ऑर्कुटवर मित्रांना कसे शोधाला?

No comments:

Post a Comment