टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

 LogMeIn ह्या कंपनीच्या वेबसाइटवर मोफत खाते कसे उघडायचे?

LodMeIn ह्या कंपनीच्या www.logmein.com वेबसाइटद्वारे आपण रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस करू शकतो.
सर्व प्रथम आपणास ज्या कॉम्प्युटरला रिमोट ऍक्सेस करायचे आहे त्या कॉम्प्युटरवर www.logmein.com ही वेबसाइट उघडा.
१) सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वेबसाइटद्वारे रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस करण्यासाठी या वेबसाइटवर मोफत खाते उघडणे आवश्यक आहे. वर सांगितलेली वेबसाइट उघल्यावर त्या वेबाइटवर वर उजव्याबाजूस आपणास नविन खाते उघडण्यासाठी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

२) Create an account  या लिंकवर क्लिक करताच आपल्यासमोर नवीन खाते उघडण्याचे पान समोर दिसेल. या पानावर मध्ये Personal Remote Access   असलेल्या LogMeIn Free  या विभागामध्ये दिलेल्या Sign Up  या लिंक वर क्लिक करा.

३) आता आपल्यासमोर New User  बनण्याचे पान उघडेल, यामध्ये फारच थोडक्यात विचारलेली माहिती भरुन आपण नविन खाते उघडू शकता.

४) हि माहितीभरुन Create Account   या बटणावर क्लिक कराताच त्या चालू कॉम्प्युटरला आपल्या खात्यामध्ये जमा (Add Computer)  च्या पानावर पोहोचता.

५) आता उघडणार्‍या नवीन पानावर LogMeIn   चे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करण्याचा प्रोग्रॅम सुरु होईल. यावेळेस आपल्यासमोर या सॉफ्टवेअरच्या इंस्टॉलेशनच्या परवानगीच्या विंडोज समोर उघडतील, त्यांना Yes, Run  आणि Grant  असे करुन तो सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटवर मध्ये लोड करावा.

६) नंतर येणार्‍या पानावर Download Now  या लिंकवर तसेच त्यानंतर येणार्‍या विंडोजमध्ये Run  या बटणावर क्लिक करुन पुढे सुरु होणार्‍या सॉफ्टवेअर लोड करावे.

७) आता पुढे सॉफ्टवेअर लोडींग सुरु होईल त्याला Next >  करुन लोड करावे.

८) पुढे परत Next >  सॉफ्टवेअर लोडींग सुरु होईल. नंतर पुढे त्या कॉम्प्युटरला काय नाव द्यायचे आहे ते विचारले जाईल. तेथे आपणास हवे असलेले नाव द्या.

९) पुढील जागेमध्ये आपणास Computer Access Code  विचारला जाईल. हा एक प्रकारचा पासवर्ड असतो, म्हणजे हा कॉम्प्युटर रिमोट ऍक्सेस करताना आपणास हा पासवर्ड विचारला जाईल.

१०) पुढे पुन्हा Next >  सॉफ्टवेअर लोडींग संपते व तो LogMeIn Free  चे सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये लोड होते. बस्स. इतकेच केल्याने तो कॉम्प्युटर आपल्या खात्यामध्ये जमा होईल.

अशाप्रकारे तो कॉम्प्युटर आपल्या खात्यामध्ये जमा होईल. आता आपण कुठूनही हा कॉम्प्युटर LogeMeIn  या वेबसाइटच्या माध्यमातून हाताळू शकतो. फक्त त्यावेळी हा कॉम्प्युटर सुरु असणे तसेच त्यावर इंटरनेट सुरु असणे आवश्यक आहे.
 ओळख : रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस
 LogMeIn ह्या कंपनीच्या वेबसाइटवर मोफत खाते कसे उघडायचे?
 रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस कसा करायचा?

No comments:

Post a Comment