टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस कसा करायचा?
 
आपल्या खात्यातील एखादा कॉम्प्युटर 'LogeMeIn Free'  द्वारे ऍक्सेस करण्याची क्रिया खाली दिली आहे.
१) इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राऊझरमध्ये www.logmein.com ही वेबसाइट उघडा.
२) वेबसाइट उघल्यावर त्या वेबाइटवर वर उजव्याबाजूस आपणास Login  ची सोय दिसेल तेथे आपल्या खात्याच्या ई-मेल आणि पासवर्डने लॉगीन करा.

३) लॉगीन  करताच आपण आपल्या खात्यामध्ये पोहोचता.  येथे आपणास आपण जमा केलेल्या कॉम्प्युटरची यादी दिसेल. जे कॉम्प्युटर त्यावेळी सुरु असतील त्यांची नावे ठळक असतील तर बंद असलेल्या कॉम्प्युटरच्या नावापुढे  Offline  असे दिले असेल. आपणास ज्या चालू कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करायचा असेल त्याच्या नावावर क्लिक करा.

४) आता आपल्यासमोर Connecting....   चे पान उघडेल, आता त्या कॉम्प्युटरशी संपर्क सुरु असतो.

५) आता आपल्यासमोर Computer Access Code  विचारला जाईल. तो व्यवस्थित दिल्यानंतरच आपणास पुढे प्रवेश मिळेल.

६) आता येणार्‍या पानावरील   Remote Control   या बटणावर क्लिक करुन आपण तो कॉम्प्युटर ऍक्सेस करु शकता, म्हणजेच तो कॉम्प्युटर जसाच्यातसा आपल्यासमोर दिसेल आणि आपण त्यावर जणूकाही तीथे बसून काम केल्याप्रमाणे काम करु शकता.

७) आता तो कॉम्प्युटर उघडेल. या सोबत तेथे Full Screen  मध्ये बघण्याची देखिल सोय असेल.
८) आपले काम झाल्यानंतर  पून्हा मगाचच्याच पानावर जाऊन Disconnect  या बटणावर क्लिक करा.
  

No comments:

Post a Comment