टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

 याहू ग्रुप  [ Yahoo Group ]  कसा सुरु कराल ?

 प्रस्तावना
इंटरनेटवर वयाचे बंधन नसलेल्या (कोणत्याही वयाच्या मुले, मुली, लहान, तरुण तसेच वृद्ध) सर्वाना एकत्र करुन ठेवणारा सर्वातजास्त प्रसिद्ध प्रकार म्हणजे 'याहू ग्रुप'.  सध्या इंटरनेटवर बरेच गृप तयार झाले असले तरी 'याहू ग्रुप' सर्वात जास्त वापरला जातो.
'याहू ग्रुप' द्वारे आपण कोणालाही (ज्याचा स्वतःचा ई-मेल असेल) आपल्या ग्रुप मध्ये (त्या व्यक्तिच्या परवानगीने) सामिल करु शकता. 'याहू ग्रुप' हा याहू वेबसाईटद्वारे मोफत चालविलेला जाणारा अजून एक उपक्रम.
एकदा का आपण आपला 'याहू ग्रुप' बनविला अथवा इतरांच्या 'याहू ग्रुप' मध्ये सामिल झालात तर आपण आपोआप त्या 'ग्रुप' मधिल सर्वांशी जोडले जाता. या 'ग्रुप' चा सर्वात मोठ फायदा म्हणजे आपणास जर एकाच वेळी अनेकांना एकच ई-मेल पाठवायच असेल तर त्या सर्वांना एक-एक करुन ई-मेल पाठविण्यापेक्ष्या त्या 'ग्रुप' ला एकच  ई-मेल पाठविल्यास तो आपोआप त्या 'ग्रुप' मधिल सर्वांना पाठविला जातो.
स्वतःचा 'याहू ग्रुप' बनविण्यासाठी आपल्याकडे फक्त याहूचा ई-मेल पत्ता असणे आवश्यक आहे. तसेच आपण कितीही स्वतःचे 'याहू ग्रुप' बनवू शकता.
इतरांच्या 'याहू ग्रुप' मध्ये सामिल होणे फार सोपे आहे, आपणास फक्त त्या 'ग्रुप' च्या सभासद (Member) होण्याच्या ई-मेलवर एक ई-मेल पाठवायचा असतो. जर त्या 'ग्रुप' च्या मॉडरेटरने ( 'ग्रुप' चे व्यवहार हाताळणारा) मान्यता दिली की लगेच आपण त्या 'ग्रुप' चे सभासद होता. नंतर त्या 'ग्रुप' च्या नावाने ई-मेल पाठविल्यास तो ई-मेल आपोआप त्या 'ग्रुप' मधिल सर्व सभासदांना पोहोचतो इतकेच की त्या तुमच्या ई-मेलची कॉपी तुम्हाला देखिल येते.
 स्वतःचा 'याहू ग्रुप' कसा बनवा.

No comments:

Post a Comment