टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 याहू ग्रुप  [ Yahoo Group ]  कसा सुरु कराल ?
 
 स्वतःचा 'याहू ग्रुप' कसा बनवा.
१. याहूची [ www.yahoo.com ] वेबसाईट सुरु करा.
२. याहूच्या वेबसाईट वरील उजव्या बाजूच्या विभागामधिल 'ग्रुप्स' [ Groups ] वर क्लिक करा.

३. आता आपल्यासमोर  चे पान उघडेल.

४. आपणास जर एखाद्या दुसर्‍यांच्या 'याहू ग्रुप' चे सभासद व्हायचे असल्यास या पानावरील 'सर्च' या जागे मध्ये आपणास हव्या असलेल्या प्रकारच्या ग्रुपचे नाव देवून शोधायचे.

५. जर आपणास आपला स्वतःचा 'ग्रुप' बनवायचा असेल तर त्याच खालिल ' Start your group ' या लिंक वर क्लिक करा.

६. जर आपण आपल्या याहू ई-मेलने लॉगिन केले नसल्यास इथे आपल्या समोर याहू लॉगिनचे पान उघडेल, इथे आपल्या याहू ई-मेलने लॉगिन करा.

७. आता आपल्यासमोर आपला 'ग्रुप' कुठल्या प्रकारमध्ये मोडतो ते निवडावे लागेल. या प्रकारमध्ये आपणास विभागामध्ये उपविभाग आढळतील.
00000

८. एकदा का आपण ग्रुपचा प्रकार निवडल्या नंतर शेवटी ' Place my group here ' वर क्लिक करा.

९. आता येणार्‍या पानावर आपल्या 'ग्रुप' संबंधी माहिती द्या व खालिल ' Continue ' बटणावर क्लिक करा.

१०. आता आपल्यासमोर तीच माहिती येईल तर खाली ' Word Verification ' शब्द विचारला जाईल. तो शब्द जसाच्या तसा देवून पून्हा खालिल ' Continue ' बटणावर क्लिक करा.

११. आता आपला ग्रुप तयार झाला असून आपल्यासमोर  चे पान येईल.

१२. याच पानावर आपल्यासमोर ' Customize Your Group ' व ' Invite People to Join ' असे दोन विभाग येतील.
यातील ' Customize Your Group ' या विभागात आपला ग्रुपमध्ये कोण सामिल होईल, ग्रुपमधिल मॅसेजेस/ईमेल्स, कोण मॅसेजेस/ईमेल्स पाठवेल, जूने मॅसेजेस पहाणे इ. गोष्टी सेट करु शकता.
तर ' Invite People to Join ' या विभागात आपण आपल्या ग्रुपमध्ये आपल्या मित्रांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करु शकता.

१३. बस्सा. या दोन गोष्टी सेट केल्यानंतर आपला स्वतःचा 'ग्रुप' तयार होतो व आपण आपल्या 'ग्रुप' च्या मुख्य पानावर पोहोचता. आपल्या ग्रुपच्या मुख्य पानावर ' Description (Edit, Add Photo) ' या विभागामध्ये आपण ग्रुपची माहिती तसेच एखादा फोटो देऊ शकता.

१४. आपल्या 'ग्रुप' च्या मुख्य पानाच्या खालच्या बाजूस चार महत्वाचे ई-मेल पत्ते दिलेले असतील.
> ' Post message : '  :-  पूढे असलेल्या पत्त्यावर ई-मेल पाठविल्यास तो ग्रुपमधिल सर्वांना मिळतो.
> ' Subscribe : '  :-  एखाद्या नविन ग्रुपमध्ये सामिल होण्यासाठी त्या ग्रुपच्या या नावापुढील पत्त्यावर ई-मेल पाठवावा.
> ' Unsubscribe : '  :-  एखादा ग्रुप बंद करण्यासाठी अथवा सोडण्यासाठी त्या ग्रुपच्या या नावापुढील पत्त्यावर ई-मेल पाठवावा.
> ' List owner : '  :-  एखाद्या ग्रुपच्या मालकास (ज्याने ग्रुप बनविला) ई-मेल पाठविण्यासाठी या नावापुढील पत्त्यावर ई-मेल पाठवावा.

१५. आपल्या 'ग्रुप' च्या मुख्य पानाच्या उजव्या बाजूच्या चौकोनामध्ये आपण 'ग्रुप' संबंधी सर्व गोष्टी हाताळू शकता. जसे नवे-जूने मेल्स, फोटो, फाईल्स, निकाल, ठराव, सभासद, कार्यक्रम इ. तसेच इतरांना 'ग्रुप'मध्ये आमंत्रित करणे, इतकेच की 'ग्रुप' बंद करण्या पर्यंतचे सर्व निर्णय इथे घेऊ शकता.

१६. थोडक्यात स्वतःचा 'याहू ग्रुप' तयार करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५-१० मिनिटे लागतील आणि एकदा का आपला 'ग्रुप' तयार झाला की पुढे 'ग्रुप' व्यवस्थित चालवा आणि सर्वांशी मैत्री वाढवा.

No comments:

Post a Comment