टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 जगातून कुठुनही आपला ( घरचा अथवा ऑफिसचा ) कॉम्प्युटर चालवा !

आता आपण कुठूनही आपल्या घरचा अथवा ऑफिसचा कॉम्प्युटर चालवू शकता आणि तसे करण्यासाठी प्रत्यक्ष तेथे असण्याची गरज देखिल नाही. यालाच 'रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस' ( Remote Computer Access ) असे म्हणतात.
बरेच वेळा असे होते की आपण आपली सर्व महत्त्वाची कामे ऑफिसच्या कॉम्प्युटरवर करत असतो. आणि घरी आल्यावर ऑफिसमधल्या कॉम्प्युटरवरची एखादी महत्त्वाची फाइल हवी असते किंवा एखाद्या वेळी आपण बाहेरच्या गावी गेल्यावर आपला ऑफिसशी संबंध तुटतो म्हणजेच आपल्या ऑफिसमधल्या कॉम्प्युटरशी संबंध तुटतो. अशा वेळी कुठूनही खरंच जगातून कुठूनही आपला कॉम्प्युटर चालवू शकलात तर ऑफिसमध्ये नसून देखिल तुमचे काम थांबणार नाही.
 सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे 'रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस' अगदी मोफत आहे आणि फार सोपे देखिल.
टीप :- रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस करण्यासाठी साहजिकच दोन्ही ठिकाणी इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
अशाप्रकारच्या  'रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस' सेवा मोफत अथवा विकत देणार्‍या काही मोजक्याच कंपन्या सध्या उपलब्ध आहेत. परंतू त्यातील LogMeIn  या कंपनीने पुरविलेली "मोफत  रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस" सेवा फारच चांगली आहे. कारण यामध्ये आपण मोफत एक, दोन नाही तर जवळ-जवळ पाच कॉम्प्युटर्स जगातून कुठूनही चालवू शकतो.
सुरवातीला एकदाच LogMeIn  या कंपनीच्या वेबसाइटवर मोफत खाते उघडल्यानंतर आपणास ज्या कॉम्प्युटरला आपणास ज्या कॉम्प्युटरला दुसरीकडून हाताळायचे असेल त्यामध्ये LogMeIn  चा एक Free  LogMeIn  असा प्रोग्रॅम एकदाच त्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून लोड करावा लागतो. हे फारच सोपे असते. एकदा का तो प्रोग्रॅम त्या कॉम्प्युटरमध्ये लोड झाला की तो कॉम्प्युटर आपल्या खात्यामध्ये जमा होतो. नंतर आपण कुठूनही (एखाद्या सायबर कॅफेतूनदेखील) LogMeIn  च्या वेबसाइटवर आपले खाते उघडून त्यामध्ये आपण जमा केलेल्या निरनिराळ्या कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करून त्यामध्ये काम करू शकतो. या सर्व गोष्टी पासवर्ड देऊन केल्या जात असल्याने सर्व सुरक्षित असतात. फक्त आपला पासवर्ड कुणाला सांगू नका.
दुसर्‍या ठिकाणाहून आपल्या घरचा अथवा ऑफिसचा कॉम्प्युटर LogMeIn  द्वारे उघडल्यानंतर आपण जणूकाही त्या घरच्या अथवा ऑफिसच्या कॉम्प्युटर प्रत्यक्ष काम करीत आहोत असे अनुभवता येते. कारण घरच्या अथवा ऑफिसच्या कॉम्प्युटर जसाच्यातसा आपल्या समोर दिसू लागतो, त्यातील सर्व प्रोग्रॅम्स, सर्व फाइली, आपले -मेल्स, सर्व फोल्डर्स, सर्वकाही म्हणजेच तोच कॉम्प्युटर दिसू लागतो, इतकेच की त्यावरुन आपण प्रिंटींग देखिल करू शकतो, इतकेच की त्या कॉम्प्युटरवरील गाणी ऐकू शकतो तसेच पिक्चर देखिल पाहू शकतो. त्यामुळे घरी अथवा ऑफिसमध्ये प्रत्यक्ष नसलो तरी आपले कुठलेच काम थांबत नाही. एखादा -मेल उघडून बघायला जेवढा वेळ लागत नाही तेवढ्यावेळेच्या आधीच आपण तो दुसरा कॉम्प्युटर उघडून हाताळू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस करण्यासाठी त्या दोन्ही ठिकाणी इंटरनेट सुरू असणे आवश्यक आहे. तसेच ज्या कॉम्प्युटरला आपणास उघडायचे असेल त्यामध्ये LogMeIn  चा प्रोग्रॅम असणे आवश्यक आहे.
 LogMeIn ह्या कंपनीच्या वेबसाइटवर मोफत खाते कसे उघडायचे?
 रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस कसा करायचा?

No comments:

Post a Comment