टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 विंडोजमधील चुकीची नोंद (Windows Error Reporting)
 


विंडोजमध्ये काम करताना बर्‍याच वेळा एखादी (कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअरद्वारे) चूक झाल्यास आपल्यासमोर आपोआप एक चौकोन येतो ज्यामध्ये “The system has recovered from a serious error”  म्हणजेच एका मोठ्या समस्येमधून आपला कॉम्प्युटर वाचला आहे असा संदेश असतो.
याच चौकोनामध्ये 'Send Error Report'  व 'Don't Send'  अशी दोन बटण असतात. याचा अर्थ आत्ता आपल्या कॉम्प्युटरला जी समस्या आली होती तीची नोंद आपणास मायक्रोसॉफ्टकडे करायची आहे का? इथे बर्‍याच वेळा आपण आपल्या डोक्याला त्रास नको म्हणून 'Don't Send'  या बटणावर क्लिक करुन (म्हणजेच या समस्येची नोंद आम्हाला करायची नाही)  तो चौकोन घालवीतो. पण त्यासोबत तो प्रोग्राम देखिल बंद होतो.
खरंतर विंडोजमधील ही सोय आपणास मदत करण्यासाठी बनविली आहे. जेणेकरुन विंडोज वापरणार्‍यांना येणार्‍या चुका सुधारुन त्यांना अधिक चांगले सॉफ्टवेअर बनविता यावे. परंतू शक्यतो बहूतेक सर्व 'Don't Send'  या बटणावर क्लिक करुन ती नोंद मायक्रोसॉफ्टला न पाठविणेच पसंत करतात. त्यांना खरंतर या येणार्‍या चौकोनाची गरज वाटत नाही.
 आपणास जर विंडोजमधील चुकीची नोंद विचारण्यासाठी येणार्‍या चौकोनाला बंद करायचे असल्यास खालील प्रक्रिया करा.
१. डेस्कटॉपवरील  वर माऊसने राईटक्लिक करुन येणार्‍या छोट्या चौकोनातील खालील ' Properties ' वर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर System Properties  चा चौकोन उघडेल. त्यातील वरील 'Advanced'  या विभागातील 'Error Reporting' या बटणावर क्लिक करा.

३. आता आपल्यासमोर अजून एक Error Reporting  चा छोटा चौकोन उघडेल. त्यातील 'Disable error reporting'  वर क्लिक करुन 'OK'. आता मगाचचाच System Properties  चा चौकोन देखिल बंद करा.

४. बस्स इतकेच केल्याने विंडोजमधील चुकीची नोंद करण्याची सोय म्हणजेच Windows Error Reporting  बंद होईल. पून्हा जेव्हा कधी आपणास त्याला पून्हा सुरु करायचे असल्यास पून्हा वरील प्रमाणे क्रिया करा.
  

No comments:

Post a Comment