टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

ट्विटरवर (Twitter ) बोला आपल्याला हवे ते !
 

'ट्विटर' (Twitter) हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंगची सुविधा देणारी वेबसाइट (संकेतस्थळ) आहे. २००६ सालामध्ये ही सुरू झाली. या वेबसाइटवर कुणीही थोडक्यात आपल्याला कुठल्याही विषयावर काय म्हणायचे आहे ते लिहू शकतात. यालाच इथे 'tweets' (पक्ष्यांची चिवचीव) असेही म्हणतात. इथे साधारण १४० अक्षरांची मर्यादा आहे. म्हणजेच आपल्याला जे काही बोलायचे आहे तो आपला संदेश आपण येथे १४० अक्षरांमध्ये लिहू शकता.
आपण इथे आपल्या खात्यामधून कुठल्याही विषयावर कितीही संदेश लिहू शकता. हि वेबसाइट प्रामुख्याने चालू विषयावरील संदेशांसाठी प्रसिद्ध आहे. इथे विषया अथवा विचारल्या गेलेल्या प्रश्नानुसार आपणे लिहिलेले संदेश जुळणारे असतील ते दाखविले जातात. उदा. आपण जर 'सचिन तेंडुलकर' विषयी आपले मत/संदेश लिहिला असेल तर या वेबसाइटवर तसे 'सचिन तेंडुलकर' विषयी माहिती विचारल्यास त्याला आपण लिहिलेला संदेश दाखविला जातो. आपले मत प्रदर्शित करण्याची सुविधा देणारी सध्याची ही प्रमुख वेबसाइट आहे. इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण या वेबसाइटवर जेव्हा काहीही शोधता तेव्हा त्या विषयासंबंधी सर्वात शेवटी (अद्ययावत) माहिती जी उपलब्ध असेल ती प्रथम दाखविली जाते. याचाच अर्थ एखाद्या माहितीला तीच्या वेळे आणि तारखेनुसार क्रमवारी मिळते, त्यामुळे सर्वात जवळची वेळ आणि तारीख असलेले मत/संदेश सर्वात वर पाहायला मिळते.
एखाद्या मत/संदेश दिलेल्याच्या नावावर क्लिक केल्यास आपण त्याने दिलेल्या सर्व मत/संदेशांना पाहू शकतो. या इथे मग 'followers' ची सोय देखिल आहे. म्हणजे या वेबसाइटवर संदेश दिलेल्या एखाद्या व्यक्तीचे जर आपण 'followers' असाल तर भविष्यात त्या व्यक्तीने कुठलेही मत प्रदर्शित केले अथवा कुठलाही संदेश 'ट्विटर' च्या वेबसाइटवर दिला तर लगेचच आपल्याला याची सूचना मिळते.
या वेबसाइटचे थोडक्यात घोषवाक्य असे की - 'कोणत्याही किंतू/परंतु शिवाय सध्या काय चालू आहे, हे शोधण्याचा सहज सोपा मार्ग.'
  
  ट्विटरवर खाते कसे उघडाल?
  आपले ट्विटरचे खाते असे वापराल?
  

No comments:

Post a Comment