टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

 तुमचे नाव टास्कबार (Taskbar) वरील घडाळ्याच्या बाजूला आणा.
 

कुठल्याही कॉम्प्युटरवर काम करताना आपणास एक गोष्ट माहित असेलच ती म्हणजे कॉम्प्युटरच्या खालील उजव्या बाजूस टास्कबारवर घड्याळ असते. त्यात दिसणारी वेळ ही AM  आणि PM  मध्ये दाखविलेली असते. उदा. 1:44 PM.
तुम्हाला माहित आहे ! त्या घडाळ्याच्या बाजूला आपला आपले नाव देखिल आणता येते.

 अशाप्रकारे त्या घडाळ्याच्या बाजूला आपला आपले नाव आणण्याची क्रिया खाली दिली आहे.
१. Start > Settings >  मधिल  Control Panel  विभाग सुरु करा.

२. आता त्यातील 'Shortcut to Regional and Language Options'  म्हणजेच  आयकॉनवर डबलक्लिक करा.
३. आता आपल्यासमोर 'Regional and Language Options' चा चौकोन उघडेल, त्यातील 'Customize...' बटणावर क्लिक करा.

४. आता येणार्‍या चौकोनातील वरील 'Time'  या विभागामध्ये असलेल्या AM symbol  आणि PM symbol  या पूढे खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे आपले नाव लिहून 'OK'  या बटणावर क्लिक करा.

५. बस्स. इतकेच करायचे आहे. पण तरीही तीथे आपले नाव आले नाही तर फक्त एक करा. ते म्हणजे त्याच खालील कॉम्प्युटरच्या टास्कबारवरील घड्याळावर माऊसने डबलक्लिक करुन पून्हा 'OK'  या बटणावर क्लिक करा.

No comments:

Post a Comment