![]() | |
---|---|
- मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एखादी नविन फाईल चालू करुन ती सेव्ह करण्यासाठी बटणांच्या वरील मेनूबारमधिल 'File' विभागातील 'Save' ह्या बटणावर क्लिक करा अथवा कि-बोर्डवरील 'Ctrl' (कंट्रोल) चे बटण दाबून 'S' हे बटण दाबा. आता कॉम्प्युटर आपणास वर्ड मधिल त्या फाईलीला साठविण्यासाठी नाव विचारेल. इथे आपणास हवे असलेले नाव द्यायचे तसेच त्या चौकोनातील वर उजवीकडे असलेल्या 'Tool' ह्या बटणावर क्लिक करावे. इथे मग अजून एक चौकोन येईल त्यातील 'Security Options' ह्या बटणावर क्लिक करावे. इथे आता आपल्यासमोर अजून एक 'Security' चौकोन उघडेल, या चौकोनातील वरच्या जागेमध्ये 'Password to open' असे लिहिलेले आढळेल. त्या पुढील चौकोनात आपणास हवा असलेला पासवर्ड द्यायचा व खालील 'OK' ह्या बटणावर क्लिक करावे, आता कॉम्प्युटर आपणास तोच पासवर्ड पुन्हा टाईप करायला सांगेल. इथे मघाचाच पासवर्ड पुन्हा देवुन 'OK' वर क्लिक करावे. ![]() ![]() मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एखाद्या फाईलला पासवर्ड द्यायचा असल्यास तो सुरवातीलाच देता येतो. म्हणजे एखादी नविन फाईल सेव्ह [Save] करताना जेव्हा आपण त्या फाईलला नाव देतो तेव्हाच त्या फाईलला पासवर्ड देता येतो. परंतु जर तरीही आपणास एखाद्या आधीच साठविलेल्या फाईलला पासवर्ड द्यायचा असेल तर ती फाईल पुन्हा नवीन नावाने साठविणे आवश्यक आहे आणि अशावेळी नवीन नावाने ती फाईल साठविताना तिला पासवर्ड देता येतो. अशाप्रकारे जर आपणास आधीच साठविलेल्या फाईलला पासवर्ड द्यायचा असेल तर ती फाईल उघडून बटणांच्या वरील मेनूबारमधिल 'File' विभागातील 'Save' ह्या बटणावर क्लिक करावे अथवा कि-बोर्डवरील 'F12' हे बटण दाबावे. आता कॉम्प्युटर आपणास तीच फाईल पुन्हा नवीन नावाने साठविण्यासाठी नाव विचारेल. इथे आपण वर सांगितल्याप्रमाणे पासवर्ड द्यावा. | |
टाईटल
PAGES
- Home
- वार्षिक नियोजन
- ज्ञान रचनावाद फोटो ...
- आकारीत शाब्दिक नोंदी
- महाराष्ट्रातील जिल्हे
- शास्त्रज्ञ
- महा.रजा अधि.1981
- माहितीचा अधिकार (RTI)
- महत्वाची संकेतस्थळे
- ध्वजसंहिता
- संगीतमय पाढे
- उपयोगी अप्लिकेशन
- परिपाठ
- गणित शिका
- विविध वर्तमान पत्रे
- महाराष्ट्र नागरी सेवा नियम
- शालेय पुस्तके pdf
- विज्ञानाच्या गमती जमती
- विज्ञान सोपे प्रयोग
- जि.प. अधिनियम
- बोधकथा
- डाउनलोड
- जिल्हा बदली प्रस्ताव
- नमुना नंबर 1 ऑनलाइन
- शालार्थ
- मराठी विषयाचे गुणनोंद तक्ते
- गणित विषयाचे गुणनोंद तक्ते
- अब्राहम लिंकनचे पत्र
- ब्लॉग कसा बनवावा.
- व्हिडीओ तयार करुया
- शैक्षणिक व्हिडीओ
- सेवा पुस्तिकेतील महत्वाच्या नोंदी
- ABL
- विविध शिष्यावृत्ती माहिती
- Google Drive चा वापर
- मराठी कविता
- भाषण
- Telegram Channel
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment