टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 कॉम्प्युटरच्या डेस्कटॉप [Desktop] वरील आयकॉन [icon] कसे लपवावे ?
 
बऱ्याचवेळा आपण कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर (सुरुवातीच्या स्क्रिनवर) एखादे चांगले चित्र "वॉलपेपर" म्हणून ठेवतॊ, पण डेस्कटॉपवर असलेल्या इतर कामाच्या आयकॉनमूळे तॊ वॉलपेपर चांगला दिसत नाही तर काहीवेळेस अर्धा वॉलपेपर त्यानेच व्यापला जातो.
डेस्कटॉपवरील बरेच आयकॉन आपण सारखे वापरत नसतॊ, पण ते उपयोगी असल्याने ते डिलिट देखिल करता येत नाहीत. परंतु हे आयकॉन डेस्कटॉपवरील चित्र खराब करीत असतात. अशावेळेस त्यांना डिलिट करण्याएवजी ते अदृष्य करणे योग्य.
डेस्कटॉपवरील आयकॉन अदृष्य करण्यासाठी डेस्कटॉपवर माऊसचे उजवे बटण (Right Click) करुन येणाऱ्या चौकोनातील 'Arrange Icons By' ह्या बटणावर माऊस नेल्यास त्याच्या बाजूलायेणार्‍या दुसर्‍या चौकोनातील 'Show Desktop Icons' वर क्लिक केल्यास डेस्कटॉपवरील आयकॉन अदृष्य होतात व आपणास वॉलपेपर पूर्ण पाहता येतो.

टिप :
 पुन्हा जर आयकॉन्स हवे असतील तेव्हा पुन्हा वरीलप्रमाणे करुन 'Show Desktop Icons' वर क्लिक करावे. मग ते सर्व आयकॉन्स पुन्हा व्यवस्थित दिसू लागतात.

No comments:

Post a Comment