टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 मॅक्रो म्हणजे काय आणि मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मॅक्रो का वापरावा?

मॅक्रो म्हणजे काय ?
- मॅक्रो म्हणजे कॉम्प्युटरमध्ये बनविला जाणारा असा छोटासा प्रोग्राम ज्यामुळे आपल्याला सतत करावे लागणारे एखादे मोठे काम क्षणार्धात व्यवस्थित करता येते.
तुम्हाला वर्डमध्ये नेहमी करावी लागणारी काही कामे खाली दिली आहेत.
१) वर्डमध्ये काम करताना एखादे वाक्य अथवा परिच्छेद तुम्हाला सतत विशिष्ट प्रकारे 'फॉरमॅटींग' करावा लागत असेल. जसे एखादे वाक्य टाईप केल्यानंतर त्याला विशिष्ट साईझ, फॉन्ट, ठळक करणे, तिरके करणे इ.
२) एखादे वाक्य, एखाद्या व्यक्तिचे नाव अथवा एखादा परिच्छेद तुम्हाला दररोज जशाच्या तसा टाईप करावा लागत असेल.
३) वर्डमधिल फाईलमध्ये तुम्हाला वेळोवेळी रोजची तारीख द्यावी लागत असेल.
या व्यतिरिक्त अशी अनेक कामे अथवा गोष्टी दररोज वर्डमध्ये काम करताना तुम्हाला कराव्या लागत असतील तर त्यासाठी जर आपण एकदाच थोडा वेळ काढून त्यासाठी एखादा "मॅक्रो" बनविला तर त्यानंतर दरवेळेस त्या मॅक्रोच्या (छोट्याश्या प्रोग्रामच्या) मदतीने ते सतत करावे लागणारे काम चुटकी सरशी करता येईल.
मॅक्रोद्वारे आपण आपल्याला करावे लागणारे काम कि-बोर्डवरील एखाद्या बटणामध्ये साठवू शकता म्हणजेच समजा एखाद्या सतत टाईप कराव्या लागण्याऱ्या वाक्यासाठी जर तुम्ही मॅक्रो बनवून ते वाक्य कि-बोर्ड मधिल एखाद्या बटणामध्ये साठविल्यास पुढच्यावेळी तेच वाक्य टाईप न करता कि-बोर्डवरील फक्त तेच बटण दाबल्यास कॉम्प्युटर आपोआप ते वाक्य टाईप करुन देतो.
 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मॅक्रो कसा बनवायचा?

No comments:

Post a Comment