टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 इतरही चांगले ब्राऊझर आहेत.
 
साधारणपणे जास्तीत जास्त लोक इंटरनेट वरील वेबसाईट पहाण्यासाठी 'इंटरनेट एक्सप्लोरर' वापरतात. यालाच आपण 'ब्राऊझर' असे म्हणतो. मायक्रोसॉफ्टच्या विंडोजमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर आधिपासूनच असल्याने तो एकमेव ब्राऊझर सर्वाना माहित असतो. परंतू नंतरच्या काळात त्या सारखे इतरही अनेक चांगले ब्राऊझर्स निर्माण झाले, ज्यांच्यामध्ये इतरही आणखी वेगळ्या सुविधा आणि वेगळेपण आहे. प्रत्येक नविन ब्राऊझरमध्ये काहीतरी वेगळेपण असतेच. अशाच निरनिराळ्या ब्राऊझर्सची ओळख इथे करुन घेवूया. बहूदा यापैकी एखादा ब्राऊझर आपल्या उपयोगाचा असू शकतो.
१) फाययफॉक्स : Firefox
http://www.firefox.com - या वेबसाईट वरुन हा ब्राऊझर डाऊनलोड करता येतो.
* ईटरनेट एक्सप्लोटर प्रमाणेच वौशिष्ट असलेला हा 'फायरफॉक्स' बाऊजर सध्या जास्त प्रमाणास प्रसिद्द होत आहे याच्र मुख्ख कारण तो अतिशय जलद , सुरक्षित बदल करण्यायोग्य आहे आकाराणे (फाईल साईज) फार लहान आसलेला हा ब्राऊजर लगेच डाऊनलोड होतो व पटकन कॉम्प्युटरमध्ये इस्टॉल (Instali) देखिल होतो जलद आणि सुटसटीत या व्यतिरीक्त इतर ब्राऊजर ( इंटरनेट एस्कप्लोर ,ऑपेरा ) मधिल सेटिंग्स म्हणजेच (Cookies ,history ,Password ,favorites) इत्यादी स्वत:कडे साठवून (Import) करण्याची सोय देखिल यामध्ये आहे सर्वात महत्वाचे म्हणजे इथे 'Ctrl+T' बटन दाबून आपण एकाच विंडोमध्ये अनेक विंडो उघडून त्यात निरनिराळ्या वेबसाईट पाहू शकतो.

२) गुगल क्रोम : Google Chrome
http://www.google.com/chrome - या वेबसाईट वरुन हा ब्राऊझर डाऊनलोड करता येतो.
* गुगलच्या इतर सुविधांप्रमाणेच गुगलने बनविलेला हा गुगल क्रोम थोड्याफार निराळ्या सुविधांसोबत दिसायलाही थोडासा निराळा आहे. याचे वैशिष्ट्य तो डाऊनलोड केल्यानंतर लगेचच कळते. वेगाने वेबसाइट उघडण्यासोबत हा सुरक्षित असून यामध्ये इतरही चांगल्या गोष्टी आहेत. जसे ऍड्रेसबारवर शोधताना हा मदत करतो. तसेच सर्वात जास्त पाहिल्या जाणार्‍या वेबसाइटची नोंद हा छोट्याश्या चित्राच्या स्वरुपात होमपेजवर ठेवतो. यामध्ये खाजगी ब्राऊझिंगची सोय देखिल आहे. म्हणजे आपल्याला नको असल्यास आपण पाहिलेल्या वेबसाइटची नोंद म्हणजेच हिस्ट्री हा ठेवत नाही.

३) ऑपेरा : Opera
http://www.opera.com - या वेबसाईटवरुन हा ब्राऊझर डाऊनलोड करता येतो.
* ऑपेरा हा देखिल असाच एक आकाराने लहान आणि जलद ब्राऊजर आहे. यामध्ये देखिल 'फायरफॉक्स' प्रमाणे 'Ctrl+T' बटनाद्वारे एकाच विंडोमध्ये अनेक वेबसाईट पाहण्याची सोय आहे. ऑपेरातील एक वैशिष्ट असे की जर एखाद्या वेबसाईटवरुन आपण एखादा भाग कॉपी - पेस्ट करुन आपल्या वर्ड सॉफ्टवेअरमध्ये घेतला तर तो कॉपी केलेला भाग वेबसाईटवर दिल्याप्रमाणे न येता म्हणजेच कुठलेही फॉरमॅटिंग न घेता साध्या फॉन्टमध्ये येतो. एखादी खाजगी वेबसाइट बघताना त्यावरील चित्र इतरांना दिसू नये म्हणून चित्राविना देखिल इथे वेबसाइट पाहता येतात. तसेच यामध्ये ब्राऊझरचे स्वरुप म्हणजेच थिम बदलण्याची देखिल सोय आहे.

४) फ्लॉक : Flock
http://flock.com/ ( सुरुवातीला www टाईप करु नये. ) या वेबसाईटवरुन हा ब्राऊझर डाऊनलोड करता येतो.
* इंटरनेटवरील कम्युनिटीमध्ये असलेल्य आपल्या मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी हा ब्राऊझर उपयोगी पडतो.  उदा.  flickr.com   सारख्या साइटवर आपल्या मित्रांशी काही गोष्टी जसे फोटो शेअर करण्यासाठी यामध्ये ड्रॅग आणि ड्रॉप सारख्या सुविधा आहेत.  Blogger.com  सारख्या साइटवर आपल्या ब्लॉगवर गोष्टी अपलोड करण्यासाठी यावर अधिक सोप्या पद्धतीने पर्याय दिलेले आहेत.याच्या नविन आवृत्तीमध्ये तर इतर ब्राऊझर्सच्या सेटींग्स घेण्याची ( Impro ) सोय आहे. तसेच यामध्ये ब्राऊझरचे स्वरुप म्हणजेच थिम बदलण्याची देखिल सोय आहे.

५) सफारी : Safari
http://browser.apple.com/safari या वेबसाईटवरुन हा ब्राऊझर डाऊनलोड करता येतो.
* सफारी हा खरंतर 'ऍपल' ह्या कंपनीचा विंडोजप्रमाणे असलेल्या 'मॅक' ह्या ऑपरेटींग प्रणालीसाठी प्रामुख्याने बनविलेला ब्राऊझर जो आता विंडोजसाठी देखिल उपलब्ध आहे. दिसायला थोडासा वेगळा आणि मॅक प्रणालीचे स्वरुप असलेला हा ब्राऊझर वापरताना एक वेगळाच अनुभव येतो.
  

No comments:

Post a Comment