टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES


 व्हर्चुअल मेमरी कशी वाढवावी?
 
 सुरुवातीला व्हर्चुअल मेमरी म्हणजे काय ते समजुन घेवूया....
कॉम्प्युटरवर काम करताना बर्‍याच वेळेस "Low Virtual Memory"  असा मॅसेज येतो. अशावेळेस आपण तो मॅसेज बंद करुन पून्हा कामाला सुरुवात करतो. पण त्यावेळेस आपण हा मॅसेज नक्कि का आला ते समजून घेत नाही. फक्त आपण इथे "Low Memory"  म्हणजे आपल्या कॉम्प्युटरची मेमरी कमी असल्याचे समजून तो मॅसेज बंद करतो.  इथे आपणास कॉम्प्युटरची रॅम (RAM)  कमी असल्याचे समजतो. प्रत्यक्षात कॉम्प्युटरमध्ये दोन कारणांसाठी कॉम्प्युटरची मेमरी वापरली जाते. कॉम्प्युटरची रॅम (RAM)  मेमरी प्रामुख्याने कॉम्प्युटर वेगाने चालण्यासाठी वापरली जाते, पण त्याच वेळेस आपण जर कॉम्प्युटरवर भरपूर निरनिराळी सॉफ्टवेअर्स वापरत असाल तर एकाच वेळेस अनेक सॉफ्टवेअर्स अथवा ऍप्लिकेशन्स चालविण्यासाठी अजूनही अधिक मेमरीची गरज पडते बर्‍याच वेळेस कॉम्प्युटरमध्ये असलेली रॅम (RAM) ही गरज भागवू शकत नाही. म्हणूनच कॉम्प्युटरमध्ये अतिरिक्त मेमरीची सोय केलेली असते. प्रत्यक्षात ही मेमरी त्या कॉम्प्युटरमधिल हार्डडिस्कची थोडीशी जागा वापरुन केलेली असते.
दर वेळेस निरनिराळी ऍप्लिकेशन्स वेगात काम करण्यासाठी कॉम्प्युटरची रॅम (RAM) वापरली जाते.  पण ऍप्लिकेशन्स भरपूर असल्यास मग कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कवरील जागा वापरुन बनविलेली 'व्हर्चुअल मेमरी' वापरली जाते तर बर्‍याच वेळेस 'व्हर्चुअल मेमरी'  देखिल कमी पडते व कॉम्प्युटरच्या खालील उजव्या बाजूच्या कोपर्‍यात 'व्हर्चुअल मेमरी कमी'  असल्याचा म्हणजेच "Low Virtual Memory"  असा मॅसेज येतो.  अशावेळेस 'व्हर्चुअल मेमरी'  वाढविण्याची गरज पडते.  जेणेकरुन त्यावेळेस कॉम्प्युटरला मेमरीची पडलेली गरज पूर्ण होईल.
आपण जर दरवेळी अनेक सॉफ्टवेअर्स अथवा ऍप्लिकेशन्स वर काम करीत असाल तर "Low Virtual Memory"   असा मॅसेज आपणास दर वेळेस नक्किच येत असेल. अशावेळेस मग 'व्हर्चुअल मेमरी'ची साईझ वाढविणे गरजेचे पडते. जेणेकरुन मग नंतर 'व्हर्चुअल मेमरी'  कमी न पडता आपले काम सुरळीत चालत राहील.

 व्हर्चुअल मेमरी वाढविण्याची क्रिया खाली दिली आहे.
१. डेस्कटॉपवरील 'My Computer'  वर माऊसचे राईटक्लिक दाबून येणार्‍या छोट्या चौकोनातील "Properties"  या नावावर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर 'System Properties'  ची विंडो उघडेल. त्यातील वरील विभागातील 'Advanced'  विभागातील "Settings"  या बटणावर क्लिक करा.

३. आता आपल्यासमोर 'Performance Options'  ची विंडो उघडेल. त्यातील वरील विभागातील 'Advanced'  विभागातील "Change"  या बटणावर क्लिक करा.

४. आता आपल्यासमोर 'Virtual Memory'  ची विंडो उघडेल. त्यामध्ये वरील जागेमध्ये कॉम्प्युटरच्या  C:  जागेची 'व्हर्चुअल मेमरी'  दाखविलेली असेल. तर त्याखालील जागेमध्ये Initial size  आणि Maximum size  च्या पुढे आपण दिलेल्या संख्या बदलून आपणास हव्या त्या आकाराने कॉम्प्युटरच्या  C:  जागेची 'व्हर्चुअल मेमरी'  वाढवू शकता. ही मेमरी खरंतर कॉम्प्युटरच्या  हार्डडिस्कचीच मेमरी असते.
  

No comments:

Post a Comment