टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

 गुगल.कॉम [ google.com ] वर आणखी काय व कसे शोधावे ?
 
एखादी माहिती हवी असल्यास ती गुगल.कॉम वर शोधल्यास मिळते ही गुगल.कॉम ची सर्वसाधारण ओळख सर्वाना माहित असते.
माहिती कुठलीही असो, लता मंगेशकरने आत्तापर्यंत गायलेल्या गाण्याची यादी असो, सचिन तेंडुलकरने आत्तापर्यंत किती शतके झळकावली, अथवा शाहरुख खानने आत्तापर्यंत किती व कोणत्या चित्रपटांमध्ये काम केले. सर्व प्रकारची माहिती गुगल.कॉम द्वारे कोणत्या कोणत्या वेबसाईटवर मिळेल ते गुगल.कॉम वर शोधता येते.
तरीही गुगल.कॉम वर एखादी माहिती कशी शोधावी अथवा गुगल.कॉमने वेगवेगळ्या प्रकारची माहिती शोधण्यासाठी कशा प्रकारे सोय करुन ठेवली आहे म्हणजे माहिती शोधताना ती गुगलवर कशा प्रकारे शोधावी याची माहिती जास्त कोणाला नसते.
गुगल.कॉम [ www.google.com ] वर वेबसाईट चालू केल्यावर त्या वेबसाईटच्या मध्यभागीच माहिती शोधण्यासाठी बटन ठेवले आहे. त्याजागी आपल्याला हवी असलेली माहिती विचारायची आणि 'गुगल सर्च' ह्या बटनावर क्लिक करायचे म्हणजे मग नंतरच्या पानावर गुगल आपण विचारलेल्या माहितीची पाने ज्या वेबसाईटवर असतील त्या वेबसाईटची यादी देतो. गुगल.कॉम वर अशा प्रकारे माहिती शोधण्याच्या ह्या प्रकारा व्यतिरीक्त इतरही विभाग आहेत.
अत्यंत सोप्या प्रकारे लोकांना गुगलवर माहिती शोधता यावी यासाठी गुगल.कॉम वर जे विविध विभाग करण्यात आले आहेत याची माहिती खाली दिली आहे.


 गुगल.कॉमवर चित्रे [ Images ] कशी शोधावी ?
गुगल.कॉम [ www.google.com ] चालू केल्यावर जिथे माहिती शोधण्यासाठी टाईप केली जाते त्याच्या वर 'Images search' असे बटन दिले आहे तिथे क्लिक करावे. आता समोर येणाऱ्या पानावर मध्यभागी असलेल्या जागी आपणास ज्याचा फोटो शोधायचा असेल ते टाईप करावे. उदा. 'Sachin Tendulkar' टाईप करा. आता बाजूच्या 'Images search' बटनावर क्लिक करा.
आता गुगल निरनिराळ्या अनेक वेबसाईटवर असलेले Sachin Tendulkar चे फोटो दाखवेल, या ठिकाणी आपणास अनेक फोटो दिसतील त्या प्रत्येक फोटोच्या खाली त्या फोटोचे नाव, त्या फोटोची साईझ आणि तो फोटो कोणत्या वेबसाईटवर आहे त्या वेबसाईटचा पत्ता असेल.
प्रयेक फोटोच्या खाली दिलेल्या साईझवरुन तो फोटो किती मोठा असेल याचा अंदाज येतो. उदा. आपण ज्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर वेबसाईट पाहत असतो त्याची साईझ साधारणपणे [ १०२४ x ७६८ ] इतकी असते यावरुन एखादा फोटो आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनपेक्षा लहान आहे की मोठा त्याचा अंदाज येतो.
आता आपणास जो फोटो हवा असेल त्यावर क्लिक करा अथवा त्या फोटोवर माऊसने राईट क्लिक करुन [ Open in New Windows ] वर क्लिक केल्यास तो फोटो असलेली वेबसाईट सुरु होईल व वरच्या बाजूस तो फोटो लहान आकारात दिसेल, इथे पुन्हा त्या फोटोवर क्लिक केल्यास तो फोटो मोठ्या आकारामध्ये उघडेल.
आता समोर उघडलेला फोटो आपल्या कॉम्प्युटरमध्ये साठविण्यासाठी [ Save ] त्यावर माऊसद्वारे राईट क्लिक करुन [ Save Picture As ] वर क्लिक केल्यास तो फोटो आपणास कोठे साठवायचा ते देऊन तो फोटो आपल्या कॉम्प्युटरमध्ये साठवावा. शक्यतो तो फोटो 'Desktop' वर साठवावा.

 गुगलला प्रश्न विविध तर्‍हेने विचारावेत
एखादी गोष्ट जर गुगलवर सर्च करुन देखिल सापडत नसेल तर गुगलला दोष न देता प्रथम आपण शोधण्यासाठी टाईप केलेला शब्द अथवा वाक्य निरनिराळ्या प्रकारे बदलून पून्हा शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपणास नक्किच ऊत्तर सापडेल.
उदा. :- समजा आपणास फॉन्ट बदलणारा प्रोग्राम / सॉफ्टवेअर हवा असेल तर खालील विविध प्रकारे तो शोधण्याचा प्रयत्न करावा.
* How to make font
* How to create font
* Develop new font
* Make or create your own font
* Design new font
वरील प्रमाणे एकच गोष्ट निरनिराळ्या प्रकारे शोधल्यास उत्तर नक्किच सापडेल.
टिप :- गुगल सर्च इंजिन हे आपल्या प्रश्नाचे उत्तर पुरविणारी गोष्ट नसून ते आपल्या प्रश्नाचे उत्तर इतर वेबसाईटवर शोधणारे एक माध्यम आहे. आपल्याला हवी असलेली माहिती जर गुगलच्या कुठल्याच वेबसाईटवर सापडत नसेल तर गुगल देखिल त्याला काहीच करु शकत नाही.

 गुगल वरील इतर गोष्टी
* गुगल.कॉम [ www.google.com ] वेबसाईट सुरु केल्यावर सुरु होणारे गुगलचे सुरवातीचे पान माहिती शोधण्यासाठी ओळखले जाते. पण त्याच पानाचे माहिती शोधण्या व्यतिरीक्त इतर देखिल उपयोग आहेत.
जवळपास २८ निरनिराळ्या प्रकारच्या विषयांवर उत्तरे मिळविण्यासाठी गुगल सर्चचा उपयोग होवू शकतो. उदा. पुस्तके शोधणे, कॅलक्युलेटर, विविध देशांच्या चलनांची चालू किंमत, व्याख्या, निरनिराळ्या फाईलींचे प्रकार, स्थानिक व्यापार शोध, चित्रे, चित्रपट, गाणी, बातम्या, पत्ता, स्पेलिंग, शेअर्स, नकाशा, हवामान इ. इ.
गुगल सर्चवर या व इतर अनेक निरनिराळ्या प्रकारच्या कोणत्याही गोष्टी शोधता येतात व त्या कशा प्रकारे शोधायच्या यासाठी अधिक माहितीसाठी खालिल लिंकवर क्लिक करा.
http://www.google.com/help/features.html

No comments:

Post a Comment