टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

लिंक्डइनवर (Linkedin) नोकरी आणि मित्र शोधा !
 

ऑर्कुट आणि फेसबुक प्रमाणेच 'लिंक्डइन' ही अजून एक सोशल नेटवर्किंगची सुविधा देणारी वेबसाइट (संकेतस्थळ) आहे. साधारण २००३ मध्ये सुरू झालेली असल्याने ती इतरांपेक्षा आधी सुरू असे म्हणता येईल. तसेच ऑर्कुट आणि फेसबुक मित्रमैत्रिणींचे ग्रुप बनविण्यावर जास्त भर न देता त्याचप्रमाणे नोकरी आणि व्यवसाय वाढविण्यावर अधिक कार्यक्षम अशी ही 'लिंक्डइन' वेबसाइट आहे. सध्या जगभरामध्ये तिचे ६ कोटी लोक याचे सभासद असून जवळपास २०० देशांमध्ये आणि शहरांमध्ये ही वेबसाइट प्रसिद्ध आहे.
या वेबसाइटचे मुख्य उद्देश ओळखीचे समूह बनविताना त्याचे एकमेकांशी नोकरी, व्यापार आणि व्यवहार यांच्या ओळखी देखिल व्हावा यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. आपल्या खात्यामधून आपण ओळखीच्या दुसऱ्याच्या लिंक्डइनवरील खात्यामध्ये जोडल्या गेल्यानंतर आपण आपोआप त्या खात्यातील इतरांशी जोडले जातो जणूकाही आपण त्याच्या ओळखीने संबंधीत इतर लोकांशी आपसातील विश्वासार्ह संपर्काद्वारे जोडले जातो.
नोकरी शोधणे, आपल्या व्यापाराची आपल्या लिंक्डइन वरील समूहामध्ये ओळख करून देणे जेणेकरून व्यापार वाढविणे, तसेच अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात रिक्त जागेसाठी योग्य व कुशल उमेदवार शोधणे यासाठी लिंक्डइन वेबसाइटचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.
या वेबसाइटवर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण आपल्याला हवा असलेला कुठलाही प्रश्न या वेबसाइटवर विचारू शकता तसेच इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देखिल देऊ शकता.
  
  लिंक्डइनवर खाते कसे उघडाल?
  आपले लिंक्डइनचे खाते असे वापराल?
  

No comments:

Post a Comment