टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

 मेंदूचा वापर
 
परवाच कुठेतरी वाचले आपण आपल्या मेंदूंचा १० टक्केच भाग वापरतो, उरलेला ९० टक्के भाग आपण कधी वापरतच नाही. मी याला २००% विरोध करतो. कारण मी एक (एकाच) अशा व्यक्तीला ओळखतो जी या वाक्याला अपवाद आहे. खरंच. तुमचा विश्वास बसणार नाही. आधी मालाही माहीत नव्हते, मग एके दिवशी अचानक कळले की काही माणसे (माफ करा मी वर एकच म्हणालो ते लगेच विसरलो.) ती व्यक्ती आपल्या मेंदूंचा ९० टक्केच भाग वापरते आणि उरलेला १० टक्के भाग वापरत नाही.
मग मी (बापडा) विचार करू लागलो की ती व्यक्ती (जगातील एकमेव) आपल्या मेंदूचा ९० टक्के भाग वापरते खरं. पण नक्की या ९० टक्के भागाचा वापर तरी कशासाठी करते?
भरपूर तास, कित्येक मिनिटे, शेकडो सेकंद आणि अनेक महिने अभ्यास केल्यानंतर मला कळले की ती व्यक्ती आपल्या मेंदूचा ९० टक्के भागाचा वापर हा विचार करण्यासाठी वापरते. झालं! आता इथे परत प्रश्न निर्माण झाला तो ती व्यक्ती मग नक्की विचार कसला करीत असेल?  मग पुन्हा भरपूर तास, कित्येक मिनिटे, शेकडो सेकंद आणि अनेक महिने अभ्यास केल्यानंतर मला कळले की ती व्यक्ती आपल्या मेंदूचा ९० टक्के भागाचा हा उरलेले १० टक्के भाग का वापरत नाही याचा विचार करण्यासाठी करते.
या मोठ्या शोधानंतर मी कुठे निवांत झोपू लागलो.  ते देखिल त्या व्यक्तीच्या बाजूला. कारण ती चौथी-पाचवी कुणी नसून माझी बायको आहे.
  

No comments:

Post a Comment